Nashik Diwali 2022 : दिवाळी शॉपिंगचा सुपरसॅटर्डे, नाशिककरांची मेनरोडला तोबा गर्दी
दिवाळीच्या निमित्ताने अंगणात लावण्यात येणाऱ्या दिवे, लखलख आकाश दिवे, दरवाजासमोर काढण्यात येणाऱ्या रंगबिरंगी रांगोळ्या, तोरण ते विविध प्रकारच्या सजावटीची साहित्याची खरेदी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर लक्ष्मीपूजन आलेले लक्ष्मीच्या प्रतिमा, लक्ष्मी, लाह्या भत्ता चे पूजेचे साहित्य खरेदीचा उत्साह देखील रस्त्या रस्त्यावर दिसून येत आहे.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणावर परराज्यातून दाखल झाले आहेत तर तोरण लाइटिंगच्या माळा, आकाश दिव्याची आणि वस्तूंचे प्रमाणात अल्प दिसून येत आहेत.
या सगळ्या वातावरणातही वर्षातला हा सर्वात मोठा सण कॅश करण्यासाठी रस्त्यावरील छोट्या विक्रीतून पासून मोठ्या व्यापारी पेढ्या ही आपापले कौशल्य पणास लावत आहेत
यंदा सर्वाधिक परराज्यातून लक्ष्मी शहरात विक्रीसाठी आल्या असून चाळीस रुपयांपासून उपलब्ध आहेत. दिवाळीला प्रत्यक्ष सुरुवात झाली असताना आणि व्यापारी पेठा खरेदीसाठी गजबळलेल्या असताना संध्याकाळी येणारे पावसामुळे खरेदीमध्ये व्यक्त येत असल्याने शहरवासीच नाही तर व्यापारी हैराण झाले आहेत.
चीनी वस्तू मग त्या लाइटिंग, आकाशदिवे, पणत्या, तोरणे काहीही असू द्या आकर्षक आणि स्वस्त असायचे. म्हणून नागरिक देशी महाग वस्तू सोडून चिनी वस्तू खरेदी करायचे.
मात्र कोरोना नंतर परिस्थिती बदलली असून बाजारात देशी वस्तूंची आवक प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. पारंपारिक सर्वच वस्तू अगदी चिनी वस्तूंच्या किमतीच्याच आजूबाजूला असल्याने लोक देशी वस्तू खरेदी करण्याला पसंती देत आहेत.
दिवाळीचा सण शुक्रवार वसुबारस पासून सुरू झाल्याने बाजारात सगळीकडे चैतन्याचा उत्सव अनुभवायला मिळत आहे. सध्या बाजारात पांढरी रांगोळी, दहा रुपये किलो, कच्चे रंग 20 रुपये किलो, पांढरी रंग मिश्रीत रांगोळी साठ रुपये किलो अशा दराने विक्री होत आहे.
याशिवाय रांगोळीची पुस्तके, रांगोळी पेन, पट्टा चालणे याची महिलांकडून खरेदी केली जात आहे. तर दरवाजाची शोभा वाढवणारे मनी, मोती, कुंदन कापड प्लास्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारातील तोरणे आकर्षण ठरत असून त्याची किंमत अगदी पन्नास रुपयांपासून सुरू होते.
दिवाळीच्या निमित्ताने अंगणात लावण्यात येणाऱ्या दिवे, लखलख आकाश दिवे, दरवाजासमोर काढण्यात येणाऱ्या रंगबिरंगी रांगोळ्या, तोरण ते विविध प्रकारच्या सजावटीची साहित्याची खरेदी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.