Nashik Diwali : पणत्या पाच रुपये, रांगोळी दहा रुपये, आकाशकंदील 20 रुपये, दिवाळीसाठी नाशिककरांची खरेदी
दीपोत्सव हा रोशनीचा सण त्यामुळे दिवाळी म्हटलं की लक्ष वेधून घेणाऱ्या रंगबेरंगी आकाशकंदीलाची प्रत्येकालाच आठवण होते. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपल्याने आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, लाईट माळ बाजारात दाखल झाले असून बाजारपेठा सज्ज झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दोन दिवसापासूनच बाजारपेठांमध्ये नाशिककरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडत असून मुख्य बाजारपेठांमध्ये विविध दिवाळी साहित्य दाखल झाले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये आकाशकंदील, पणत्या, कलरफुल रांगोळ्या यासह विविध प्रकारच्या लाईट्स आणि दिव्यांच्या माळा सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. मेड इन चायना बरोबरच यंदा भारतीय बनावटीच्या लाईट माळांना पसंती मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्के दरवाढ झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितले दिवाळीचा असा नाव घ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने किराणा सजावटीचे साहित्य पूजेचे साहित्य पण त्या आकाश कंदील कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उलटली आहे.
दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटल्याने यंदा बाजारात तेजी दिसून येत आहे रोज नाही चा उत्सव असलेल्या सनानिमित्त विद्युत माळांच्या बाजारात गर्दी वसंतून वाहत आहे.
चायनामेड वस्तू बरोबर यंदा भारतीय बनावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. चायना मालाची कोणतीही खात्री नसल्याने हळूहळू त्यांची मागणी कमी होत आहे दोन वर्ष कोरोनामुळे यंदा बाजाराला मोठा फटका बसला होता. मात्र यंदा हा बाजार सावरताना दिसत आहे.
नाशिकच्या बाजारात दिल्ली मुंबई कोलकत्ता बंगलोर येथून लाइटिंग येथे एलईडीवर आधारलेली असते आता स्वदेशी लाइटिंग देखील आहे पण त्यांची किंमत आणि चायनीज लाइटिंग ची किंमत यामध्ये फरक दिसून येत आहे.
दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सह...घरोघरी पणत्या पेटवून अंगण उजळून टाकले जाते. सध्या बाजारात विविध प्रकारच्या पणत्या दाखल झाल्या असून थ्रीडी पणत्यांनी आकर्षण निर्माण केले आहे.
नाशिकच्या बाजारात दिल्ली मुंबई कोलकत्ता बंगलोर येथून लाइटिंग येथे एलईडीवर आधारलेली असते आता स्वदेशी लाइटिंग देखील आहे पण त्यांची किंमत आणि चायनीज लाइटिंग ची किंमत यामध्ये फरक दिसून येत आहे.
दीपोत्सवासाठी रंगबेरंगी कागदी, प्लास्टिक आणि कापडी आकाशकंदील बाजारात दाखल झाले असून दोन वर्षानंतर आकाशकंदील बाजाराला बहर आला आहे.