Nashik Waghera Fort : वाघेरा किल्ल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा, वीरगळी, तेल-चुन्याच्या घाण्यांना उर्जितावस्था
नाशिकच्या सह्याद्रीच्या नऊ शिखरांच्या डोंगररांगेत अनेक ऐतिहासिक घटना, घडामोडींची ओळख देणाऱ्या अनेक जुन्या वास्तू आढळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या ऐतिहाशिक पाउलखुणांचा शोधया शिवारफेरी काढण्यात आली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक विरगळी, जुन्या मूर्ती, कोरीव दगड, दगडी तुळशी वृंदावन, समाधी, चुन्याच्या घण्याचे जुने दगडी चाक अशा कित्येक ऐतिहासिक पाऊलखुणा सापडल्या आहेत.
अनेक ऐतिहासिक घटनांची ओळख देणाऱ्या अनेक पाउलखुणांचा शोध घेतला जाणार आहे. यानिमित्ताने इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करता येईल. या माध्यमातून काही संदर्भ हाती लागतील असे दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.
इतिहास अनेक अंगाने मांडला जातो, कोणी पोवाडे गाऊन तर कोणी कवने, गीते व कथा सांगून, जुन्या जाणकार माणसांच्या तोंडून हा इतिहास ऐकायला मिळतो.
अनेक गावागावात इतिहास दडलेला आहे. मात्र शोधण्याची दृष्टी असली की इतिहासाचे दाखले,संदर्भ हाती लागतात. त्यासाठी तुमच्याकडे त्या त्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याची उर्मी लागते.
शिवकार्य गडकोट संवर्धनसंस्थेच्या माध्यमातून अनेक गडकिल्ल्याना नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वाघेरा किल्ल्यावर मोहीम राबविण्यात आली.
अनुभव व जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हा इतिहासाचा शोध तो ही दगडात कोरलेल्या ऐतिहासिक पाउलखुणांतून घेतला जात आहे. याकामी इतिहास संशोधन व संशोधक यांची ही मदत मिळते.
नाशिकच्या गडकिल्ले व त्यांच्या आजूबाजूंच्या गावाला अनेक इतिहासाचे दाखले तेथील दगडातून मिळतात. त्या दृष्टीने नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील वाघेरा किल्ला परिसरातील गाव त्यात दडलेल्या काही दगडी पाऊलखुणा खूपच विविधता दाखवणाऱ्या आहेत.
वाघेरा किल्ल्यावरही अनेक ऐतिहासिक संदर्भ दर्शवणा-या पाऊलखुणा आढळल्या आहेत. त्या संदर्भात इतिहास संशोधन मंडळातील मंडळींकडून अभ्यासात्मक नोंदी तयार केल्या जाणार आहेत.