Nashik Ganesh Jayanti : नाशिकच्या चांदीच्या गणपतीला नारळाच्या पानांची आरास, कॅडबरीसह विविध फळांचा महाप्रसाद
नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेला चांदीचा गणपती संस्थांनच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या साजरा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानिमित्त श्रींच्या मंदिरात आज कालपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यामध्ये श्रींची पूजा व महाप्रसाद तसेच गणेशाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे.
नाशिक शहरातील गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जयंती सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधींनी साजरा करण्यात येत आहे. आज दुपारी नाशिक शहरातील गणेश मंदिरांमध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने सकाळपासूनच चांदीच्या गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नाशिक शहरातील चांदीचा गणपती यासह सर्व गणेश मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
दरम्यान माघ महिना हा अनेक वेगवेगळ्या धार्मिक कार्यांसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे या माग महिन्यात गणेश जयंती येत असल्याने अनेक ठिकाणी रविवारपासूनच मागे गणेशोत्सव आला प्रारंभ झाला.
आज 25 जानेवारीला माघ शुक्ल चतुर्थी असून या चतुर्थीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील चांदीच्या गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
दरम्यान चांदीच्या गणपती मंदिरात दुपारी गणेश जन्मकाळ सोहळ्यावेळी गणेश पाळणागीते म्हणण्यात आली. तसेच आज सायंकाळी चांदीच्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान माघ महिन्यात येणारे शुल्क चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि वर चतुर्थी अशीही म्हटलं जातं.
पहाटेपासून मंत्रोच्चार आणि सनई वादनाने महाभिषेकाला झालेली सुरुवात, गणपती बाप्पा मोरयाचा होणारा गजर, पालखी मिरवणुकांनी वातावरणात निर्माण झालेले चैतन्य झाले होते.
चांदीचा गणपती येथे गणेश स्मरण, शांतीसुक्त, प्रधान संक्लप, मातृका पूजनासह इतर विधी करण्यात आले. पहाटे चार वाजता सनई वादनानंतर, गणेशमूर्तीचे अभ्यंग स्नान, महादुग्धाभिषेक, महाआरती करण्यात आली.