Nashik News : नाशिक जिल्ह्यातलं कुपोषण रोखण्यासाठी महत्वाचं पाऊल, काय आहे हा प्रकल्प?
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांचे संकल्पनेतून आयआयटी मुंबई यांच्याव्दारे बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वकांक्षी उपक्रम नाशिक जिल्हयात राबविण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक उपक्रमाव्दारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक मधून 250 प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवाराचे 3 महिन्यांकरीता गावपातळीवरील प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या 250 प्रशिक्षकांमधून 50 मुख्य प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांचेकडील जिल्हाभरातील 2500 अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात आलेली आहे.
अधिकारी व कर्मचारी यांची उपक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अॅपव्दारे परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. सदर परीक्षा ही इमो टेस्ट व प्री-टेस्ट या दोन स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे.
सदर परीक्षा गट विकास अधिकारी यांचे नियत्रणात गट शिक्षण अधिकारी यांचे सहाय्याने व तालुका आरोग्य अधिकारी ,बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखी खाली पार पडणार आहे.
निफाड येथील परीक्षा केंद्रावर आज जिल्हा कार्यक्रम आधिकारी (महिला व बाल विकास) दीपक चाटे यांनी अचानक समक्ष भेट देऊन परीक्षा सुरळीत चालू आहे किंवा कसे याबाबत पाहणी केली.
त्याचप्रमाणे शिलापूर व कोठरे येथील अंगणवाडी केंद्रात भेट देऊन तेथील बालकांची वजने उंची घेतली व आहार विषयक तपासणी केली.
अंगणवाडी केंद्रातील स्वच्छता ठेवणे बाबत तसेच पोषण आहार सर्व लाभार्थ्यांना देणे बाबत सूचना देण्यात आल्या. अंगणवाडीतील बालकांना आहार देण्यापूर्वी त्यांचे हात स्वच्छ धुऊन घेणे व शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे दररोजचा नियमित पोषणआहार देणे.
एकही कुपोषित बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सक्त सूचना दीपक चाटे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास विभाग) जिल्हा परिषद नाशिक यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना दिल्या.