Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sant Nivruttinath Palkhi : 'गळ्यात तुळशीमाळा, डोईवर तुळशी वृंदावन, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान, पाहा फोटो
'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया, 'विठ्ठलाच्या पायी नीट झालो भाग्यवंत' अशा असंख्य अभंगांनी त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली. आज संत नियोजनात महाराज पायी दिंडी पालखी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान झालेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गळ्यात तुळशीमाळा, डोईवर तुळशी वृंदावन, हाती वीणा, मुखात हरिनाम' अशा भक्तिमय वातावरणात आज संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीचा रथ पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. आज दुपारी त्र्यंबकेश्वर नगरीतून पालखी सोहळ्याला सुरवात झाली.
सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर जवळील प्रयागतीर्थ परिसरात महानिर्वाणी आखाड्यात घेतला जात आहे. यानंतर उद्या सकाळी पुन्हा पंढरपूरकडे जाण्यसाठी दिंडी सोहळा मार्गस्थ होणार आहे.
तत्पूर्वी दोन दिवसांपासून वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत होते. मराठवाडा, विदर्भ, परभणी, धुळे, नंदुरबार, जळगाव येथून भाविक भक्त त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून 25 हजार वारकरी या दिंडीत सामील होतील असा अंदाज आहे.
यावेळी हजारो वारकरी बांधवांनी या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभाग घेत आनंदवारीचा आनंद लुटला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.
पहाटेच्या सुमारास पारंपरिक पूजा विधि झाल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.
यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरातील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होत आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरु गहिनीनाथांची समाधी असल्याने इथे पहिला मुक्काम होणार आहे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी रथ तयार करण्यात येतो. सात वर्षांपूर्वी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मागील विश्वस्त मंडळांने चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी तयार केलेला आहे.
या रथाला झळाळी देण्यात आली असून आज दुपारी रथाद्वारे नाथांच्या पालखी सोहळ्याला सुरवात झाली. दरम्यान सर्वात लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश होतो.