Malegaon : मालेगावच्या शिवप्रेमीने शिवरायांसाठी उभारलं किल्ल्याचं घर, गुटखा व दारू पिणाऱ्यांना घरात प्रवेश नाही...
नाशिकच्या मालेगावातील संतोष पाटील यांनी स्वतःच्या घराला गड किल्ल्यांचे स्वरूप देत महाराजांविषयी असलेले अनोखे प्रेम व्यक्त केलं आहे..या शिवप्रेमीची आणि गड - किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या अनोख्या घराची परिसरात चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रवेश द्वारालाच तोफा, आणि भिंतीवर ढाल - तलवार प्रतिकृती बसविण्यात आली आहे..तर समोरच्या बाजूस भिंतीवर 'राजमुद्रा ' साकारण्यात आली आहे. घराच्या उंच अशा छतावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज व एक तोफ देखील टॉवर वर ठेवण्यात आली आहे.
घराच्या चारही बाजूस किल्ल्यावरील बुरुज व तटबंदी असल्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. संपूर्ण घराला किल्ल्यावरील दगड मातीचा रंग व भगव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.
घरातील जिन्यावरून ये - जा करतांना एखाद्या किल्ल्यावर आपण जात असल्याचा आभास देखील होतो. प्रत्येक ठिकाणी छ.शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात आली आहे..
दरम्यान घरात प्रवेश केल्यानंतर बैठक हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते. हॉलमधील संपूर्ण एका भिंतीवर छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असून याच हॉलमध्ये आलेल्या अभ्यांगतांना बसण्यासाठी अष्टप्रधान मंडळाला बसण्यासाठी सिंहासनासारख्या खुर्च्या देखील ठेवण्यात आल्या आहेत.
विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सज्जनगड, तोरणा, पुरंदर, रायगड, शिवनेरी, पन्हाळा आदी गड - किल्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. घरातील दुसऱ्या हॉलमध्ये तुळजा भवानी, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, जिवाजी महाला, शिवा काशिद, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शेलार मामा आदींसह स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली, अशा सर्व मावळ्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत..
छ.शिवाजी महाराजांचा इतिहास, गड - किल्ले यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी, महाराजांचे विचार सदैव आपल्या पाठीशी रहावे,महाराजांचे विचार पुढच्या पिढीला आत्मसात व्हावे हा एकमेव उद्देश हे घर उभारण्यामागे असल्याचे डॉ संतोष पाटील सांगतात..
नुसतेच गड किल्ल्यासारख्या भिंती उभारल्या असे नाही, तर या घराचे पावित्र्य राखण्याचे काम देखील डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे. आपल्या घराला महाराजांचा दरबार म्हणून मानणारे डॉ.पाटील यांनी घरात प्रवेश करतेवेळी 'गुटखा व दारू पिऊन येणाऱ्यास घरात प्रवेश नाही ' असा मजकूर लिहून ठेवला आहे.
राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेकांनी या घराला भेट देत कौतुक केले आहे. ते फेसबुक पोस्टद्वारे लिहतात कि, मालेगांव शहरातील भायगांव शिवार येथील शिवप्रेमी डॉ.संतोष पाटील यांच्या गड-किल्ला स्वरुपाच्या घराला भेट दिली.