Independence Day : नाशिकच्या चिमुकलीचे स्वातंत्र्यदिनी मराठमोळं फोटोशूट, सोशल मिडीयावर झाली व्हायरल
नाशिकच्या इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात स्वातंत्र्य दिनाचा फिव्हर असून हर घर तिरंगामुळे आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त करत आहेत.
अनेकदा सोशल मीडियावर काही न काही व्हायरल होते. गार्गीने केलेले मराठमोळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस येथील गार्गी आहेर या चिमुकलीचे हे फोटो व्हिडीओ आहेत.
गार्गी सागर आहेर अस या चिमुकलीचे नाव असून ती इयत्ता पहिलीत शिकते आहे.
गार्गीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गार्गीने मराठमोळा पेहराव केला असून हातात तिरंगा घेत ऊर्जा देणारे फोटोशूट केले आहे.
गार्गीला लहापणापासूनच घरात आवडीच्या गीतांवर डान्स करणे आवडते. यातूनच डान्सची, अभिनय करण्याची गोडी लागली.
आहेर कुटुंबीयांनी गार्गीची आवड बघून तिला संधी उपलब्ध करून दिली. मग दरवेळी अनेक कार्यक्रमांना ती आवड जोपासत असते.
फेब्रुवारी महिन्यात साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त गार्गीचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आज तिने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटो, व्हिडीओ शूट केले आहे.
नाशिकच्या इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.