Harbhajan Singh : भज्जीनं घेतला पिठलं भाकरीचा स्वाद; नाशिकमध्ये स्वत: बनवलं चुलीवरच जेवण..
माजी फिरकीपटू तथा खासदार हरभजन सिंघने नाशिकमध्ये येत स्वतः जेवण बनवत पिठलं भाकरीचा भाकरीचा आस्वाद घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे भज्जीने या पिठलं भाकरीचे तोंडभरून कौतुक करत आस्वाद घेण्यासाठी 'पुन्हा येईन' असहि त्याने सांगितले.
फिरकीपटू म्हणून ओळख असलेला आणि चांगल्या चांगल्या फलंदाजांचा त्रिफळा उडविणारा हरभजन सिंग सध्या राजकारणात सक्रीय आहे. दरम्यान अनेकदा तो राज्यसभेत दिसतो.
यातून वेळ काढत हरभजन सिंगने नुकतीच नाशिकमध्ये आला होता. यावेळी त्याने त्र्यंबकरोडवरील हॉटेल संकृतीला भेट देत स्वतः जेवण बनवले. तसेच पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला.
दरम्यान नाशिकच्या पूजा विधीसाठी प्रसिध्द असलेल्या त्र्यंबकेश्वरला त्याने भेट दिली. यावेळी येथील शिखरे गुरुजीच्या माध्यमातून पूजा केल्याचे समजते. पूजा केल्यानंतर हरभजन सिंग जेवण करण्यासाठी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील बेळगाव ढगा परिसरात हॉटेल संस्कृतीला जेवण केले.
यावेळी त्याने स्वतः किचनमध्ये जात चुलीवर जेवण कसं बनवितात? चूल कशी पेटवितात? याविषयी जाणून घेतले. शिवाय महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेनू असेलला पिठलं भाकरी त्याने बनवून आस्वाद घेतला. जेवणांतर त्याने या मेनूचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी हॉटेलचे संचालक दिग्विजय मानकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्याने स्वतः किचनमध्ये जात चुलीवर जेवण कसं बनवितात? चूल कशी पेटवितात? याविषयी जाणून घेतले. शिवाय महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेनू असेलला पिठलं भाकरी त्याने बनवून आस्वाद घेतला.
जेवणांतर त्याने या मेनूचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी हॉटेलचे संचालक दिग्विजय मानकर यांनी त्यांचे स्वागत केले.