PHOTO : 'माझं काय चुकलं?' आमदार सुहास कांदे यांचे आदित्य ठाकरे यांना 10 सवाल

Continues below advertisement

Suhas Kande Question

Continues below advertisement
1/10
शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार निवेदन देणार आहेत.
2/10
्मनमाडमध्ये आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे.
3/10
या मेळाव्यात सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन मनमाडला जाणार आहेत.
4/10
याबाबत मनमाडमध्ये होर्डिंग देखील लावले आहेत.
5/10
'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरुन शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख या निवेदनात असणार आहे.
Continues below advertisement
6/10
पालघर साधू हत्याकांड, मालवण येथील हिंदूंचं पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून शिवसेना दूर गेली, यावर 'माझं काय चुकलं' असं म्हणत सुहास कांदे यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
7/10
त्यांच्या या निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली आहे.
8/10
हे निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्याआधीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल विचारले आहेत.
9/10
आदित्य ठाकरे यांना या सगळ्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत.
10/10
सुहास कांदे यांच्या या भूमिकेमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sponsored Links by Taboola