Nashik Sanjay Raut : पहिल्याच बॉलवर थेट चौकार; नाशिकमध्ये संजय राऊतांची बॅट तळपली
खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सामनाच्या अग्रलेखातनं किंवा आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना ते चांगलेच फटकारे लगावत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज ते खऱ्याखुऱ्या क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. मागील सामन्यात पहिल्याच बॉलवर क्लीनबोल्ड झाले होते. आज त्यांनी चौकाराने समाचार
संजय राऊत पुन्हा संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर आले असून मात्र ते येण्यापूर्वीच 40 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
त्यामुळे मागच्या वेळी संजय राऊत आले तेव्हा डॅमेज कंट्रोल रोखण्यात यश आलं, असा समज असताना 12 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटातून काढता पाय घेतला. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला.
त्यावेळी त्यांनी एका क्रिकेट सामन्याच्या उदघाटन प्रसंगी बॅट हातात घेतली, मात्र पहिल्याच बॉलवर क्लिनबोल्ड झाले होते.
तर आजच्या सामन्यात मात्र त्यांची बॅट तळपताना दिसून आली, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सुद्धा फलंदाजी अशी होणार का? याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान आज पुन्हा संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून ते गंगापूर रोड परिसरात GPL गंगापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर अजय बोरस्ते यांच्यां विरोधातील संभाव्य उमेदवार युवराज ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.
दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर शिवसेना कार्यलयात पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. असा एकूण आजचा कार्यक्रम आहे.
काही दिवसांपासून ठाकरे गटातून आउटगोइंग सुरू असल्याने संजय राऊत आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
त्याचबरोबर नाशिक मध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत दरम्यान ते येण्यापूर्वीच चाळीस पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्याचबरोबर नारायण राणे यांच्याबरोबर शाब्दिक वाद सुरू असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
आज मात्र चौकार, षटकार मारण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरले आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला आहे.