Photo: नाशिकच्या मुलांचे योगा प्रकार पाहून डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही! पाहा फोटो
दैनंदिन जीवनात योगाचे स्थान अनन्यसाधारण असून सर्व खेळाडूंना आपल्या खेळासोबतच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास महत्वाचा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 अंतर्गत योग क्रीडा स्पर्धा उद्घाटन पार पडले
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, इतर खेळ खेळण्यासाठी साहित्याची व मैदानाची आवश्यकता असते. परंतु योग करण्यासाठी आपणास कोणतेही साहित्य आवश्यक नसून घरातही आपण योगाभ्यास करू शकतो.
दररोज खेळाडूंनी सकाळची 20 मिनिटे योगासाठी देणे आवश्यक आहे. यातून खेळाडूंची खेळातील एकाग्रता वाढीस लागून खेळांचे सादरीकरण करतांना निश्चितच याचा फायदा होणार आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणकावर डिजीटल खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळांमध्ये जास्त सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.
कोणाताही खेळ खेळतांना त्यात जिद्द, चिकाटी, मेहनत व सांघिक भावना या गोष्टी महत्वाच्या आहे.
खेळा खेळतांना आपल्याकडून कोणत्या चुका होतात याचेही खेळाडूंनी स्वत: आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
यातूनच खेळाडूंची इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढून आपल्या खेळात प्राविण्य मिळवून ते यशाचे शिखर गाठतील, असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाशिकच्या स्वानंदी वालझडे व आकांक्षा दिवेकर यांच्यासह योग खेळाडूंनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
image 10