Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेसाठी पहिल्या चार तासात राजभाऊ वाजेंच्या सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान, पाहा Photos
नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नरमध्ये सर्वाधिक 20.16 टक्के मतदान झाले आहे. यापाठोपाठ इगतपुरीत 17.33 टक्के मतदान झाले आहे. नाशिक पूर्व 16.81, देवळाली 16.5, नाशिक पश्चिम 16.24, तर सर्वात कमी मतदान नाशिक मध्य येथे 11.16 टक्के झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी नाशिकमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल, सिडको या मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्र २२८ वर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मनपा शाळा क्र.१४,१५ मखमलाबाद येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
बॉईज टाऊन स्कूल येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.