Ganesh Chaturthi 2022 : गौरीच्या मूर्तीची जर्मनीत निर्मिती; नाशिकमधील सुंदर मूर्ती ठरतायत आकर्षण
घरोघरी गौरी आवाहन झाले आहे. या निमित्ताने नाशिकच्या शहाणे कुटुंबियांनी आपल्या घरी गौरी-गणपतीची स्थापना केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, या गौराई महाराष्ट्रातल्या नसून चक्क जर्मनीला महालक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. नाशिकच्या घरी सोनपावलांनी त्यांचे आगमन झाले आहे.
अत्यंत सुंदर, देखणं आणि अनोखं असं रूप या गौराईचं पाहायला मिळतं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या माहेरवाशिणीच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळतो अगदी तसाच आनंद या गौरीकडे बघितल्यावर होतो.
पश्चिम जर्मनीतील एका कारागिराने चार महिने मेहनत घेत या मूर्ती साकारल्या आहेत. फायबरच्या जरी वाटत असल्या तरी त्या शिवण या भरीव लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत.
एका गौरीचे वजन हे जवळपास 80 किलो एवढे असून त्या 100 वर्ष टिकतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या गौराईंचे केस, डोळे, कान, ओठ हे अत्यंत हुबेहूब असे आहेत.
लक्ष्मीच्या डोळ्यांकडे तर किती वेळ बघतच रहावेसे वाटते.
मूर्तीवर सोने चांदीचे जवळपास 5 किलोहून अधिक दागिन्यांची आभूषणे असून मंगळसूत्र, राणीहार, कंबरपट्टा अशा प्रत्येक दागिन्यांनी महालक्ष्मी साकारण्यात आल्या आहेत.
गौरी गणपतीचे हे दृष्य अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.