Nashik Ganesh Visarjan : नाशिककरांचा बाप्पाला निरोप, मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक पार
नाशिक शहरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. या मिरवणुकीत गणेश भक्तांचा जनसागर उसळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या रामकुंड परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पर्यावरण पूरक गणेश उत्सवाला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिवसेवा मित्र मंडळाच्या 27 फूट उंचीच्या महागणपतीच्या मिरवणुकीत हरियाणातील कलाकारांनी सहभागी नोंदवला.
महादेव, अघोरी साधू, नंदीवर आरूढ झालेले शिव-पार्वती अशी पौराणिक वेशभूषा धारण केलेले कलाकार मिरवणुकीत सहभागी झाले.
मानाच्या पहिल्या नाशिक महानगरपालिकेच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक पार पडली.
या मिरवणुकीत महाराष्ट्राची परंपरा जपत बाप्पाची वारी घेऊन नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथील वारकरी टाळ मृदुंग वाजवत गणरायाला निरोप दिला.
नाशिकच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नाशिकचा राजा मार्गस्थ झाला . शिवकालीन शस्त्रांची माहिती पुढील पिढीला व्हावी यासाठी मिरवणुकीत शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक विघनहरण ढोल पथकांच्या माध्यमातून सादर करण्यात आले.
image 10