Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar News: नंदुरबारच्या युसूफभाईंनी रस्त्यावर पडलेला 100 किलो नायलॉन मांजा केला गोळा
देशासह राज्यात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र दुसरीकडे नॉयलॉन मांजाच्या (Nylon manja) वापरामुळे अनेक नागरिक जखमी झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह माणसांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी नंदुरबारातील युसूफ खान यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात फिरून तब्बल 100 किलो मांजा गोळा केला.
फक्त गोळा केला नाही तर तो नष्ट देखील केला आहे. केवळ यंदाच नाही तर ते गेल्या 15 वर्षांपासून मांजा गोळा करून सामाजिक दायित्व निभावत आहेत.
संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो.
पतंगोत्सवात कापलेल्या पतंगांचा मांजा रस्त्यावर पडतो किंवा झाडाझुडपांमध्ये अडकतो. अर्धवट राहिलेल्या मांजामुळे अनेक पक्षी आणि नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
नंदुरबार शहरातील पानटपरी चालक असलेल्या युसुफभाईंच्या मनावर परिणाम करून गेली. मांजामुळे जखमी झालेल्या पक्षाच्या यातना सहन न झाल्याने त्यांनी संक्रांतीनंतर पाच दिवस आपला व्यवसाय सोडून मांजा गोळा करतात
नंदुरबर जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र या काळात पतंग कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा झाडावर अडकतो किंवा रस्त्याचाकडेला जाऊन पडतो.
15 वर्षापूर्वी युसुफ भाईने जखमी पक्षी पहिला आणि मांजामुळे झालेल्या आपघातात जखमी झालेले नागरिक पाहिले आणि त्या दिवसापासून त्यांनी संकल्प केला.
संक्रांतीनंतर पाच दिवस शहरातील कानाकोपऱ्यात फिरून मांजा गोळा करतात आणि नष्ट करतात
सरकारने नायलॉन मांजा आणि त्यासोबत इतर घातक मांज्यांवर बंदी घातलेली असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात मांजा सापडतोच कसा असा सवाल युसूफभाई उपस्थित करतात.
सरकारने पर्यावरणाला घातक असलेल्या मांजा निर्मितीवरच बंदी घालावी अशी मागणी युसुफ भाई करतात.