Trimbakeshwer Yatra : 'सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी...' नाथांच्या वारीला त्र्यंबक नगरी दुमदुमली!
'राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या असून त्र्यंबकनगरीसह परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभगव्या पताका, हाती टाळ मृदुंगाच्या तालात त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे. त्र्यंबक नगरीत दाखल होणाऱ्या दिंडीचे नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने सोमवारपासून 21 जानेवारीपर्यंत पौषवारी यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
डोक्यावर तुळशी वृंदावन, माऊलीचा गजर विणेकरी टाळकरींचा अखंड नाद असं उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरण त्र्यंबक नगर पाहायला मिळत आहे.
आज सकाळपासूनच नाशिक शहरासह त्र्यंबक शहरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष दुमदुमत आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर येऊन तेथे अभंग, ब्रह्मगिरीचे दर्शन घेत दिंडी मंदिर प्रांगणात पोहोचत आहेत.
दोन दिवसांपासून नाशिक त्र्यंबक मार्ग भव्य पथक हाती घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांनी गजबजला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत नव्याने सुरू झालेल्या शंभरावर पाय दिंड्या शहरात मुक्कामी पोहचल्या.
तर वर्षानुवर्षे येणाऱ्या बहुतेक दिंड्या शहरापासून पाच सहा किलोमीटर परिसरात विसावल्या आहेत. आज सकाळी त्यांचे त्र्यंबकच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं तर असंख्य दिंड्यां ह्या त्र्यंबक शहरात पोहोचल्या. त्यामुळे त्र्यंबकमध्ये भाविकांची गर्दी झाली असून ज्ञानोबा माऊलीचा जयघोषाने त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे.
त्र्यंबकेश्वर कोरोनामुळे दोन वर्ष संत निवृत्तीनाथांच्या वारीला ब्रेक लागला होता. मात्र यंदा मोठा उत्साह असून संत निवृत्तीनाथांच्या पौष वारीसाठी प्रशासनाची तयारी.
यासाठी राज्यभरातून मानाच्या दिंड्यांसह पायी दिंड्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात आगमन केले आहे. त्यामुळे सगळीकडेच भगव्या पताकां, वारकरी मोठ्या संख्येने दिसून येत आहे.
त्र्यंबक नगरीचे रस्ते वारकऱ्यांनी गजबजले असून सगळीकडे हरिनामाचा गजर दुमदुमत आहे. रस्त्याने महिला, पुरुष वारकरी हातात टाळ, मृदुंग, झेंडा, तुळशीवंदन घेऊन त्र्यंबक नगरी गाठत आहेत.
नाथांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी 500 हून अधिक दिंड्या त्र्यंबक नागरिक दाखल झाल्या आहेत.
18 जानेवारी रोजी पहाटे चार वाजता शासकीय महापूजा होईल. महापूजा नंतर नगरपरिक्रमा होणार आहे.