Papaya Rate: यंदाच्या हंगामातील पपईला सर्वाधिक दर, शेतकऱ्यांच्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर निश्चित
पपईला चांगला दर मिळत असला तरी उत्पादन घेतल्याने शेतकऱ्यांची अवस्था कभी खुशी कभी गम आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे
नंदुरबार जिल्ह्यातूनच पपई चे बाजार भाव ठरत असतात. शहादा बाजार समितीमध्ये पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
मात्र पपईवर आलेल्या विविध विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे
आवक घटल्याने पपईचे दर महागल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात पपईचे दर 13 रुपये प्रति किलोने सुरू होते.
मात्र आलेल्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या उत्पादनात प्रचंड घट आले असून आवक कमी झाली आहे
त्याचा परिणाम बाजारपेठेत पपईची मागणी वाढली असून व्यापारी आणि शेतकरी यांच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक होऊन पपईच्या दरात चार रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आले आहे.
पपईचे दर हे या हंगामातील सर्वाधिक दर आहेत पपईचे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
पपई उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असला तरी पपईच्या उत्पादनात आलेल्या घटीमुळे शेतकऱ्यांची अवस्था कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.