Nanded News: माहूरच्या रेणुका मातेला भक्तांनी दिलं भरभरून दान, दानपेटीत एका महिन्यात तब्बल 22 लाख रुपयांचा ऐवज जमा
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ माहूरच्या रेणुका माता मंदिरातील भक्तांनी भरभरून दान दिलयं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहुरच्या दानपेटीत एका महिन्यात तब्बल 22 लाख रुपयांचे ऐवज जमा झालाय.
दर महिन्याला रेणुका माता मंदिरातील दान पेटीतील ऐवजासह रोख रक्कम मोजणी मंदिर प्रशासनाकडून केली केली जाते
यावेळी झालेल्या मोजणीत रोख रक्कम 10,18, 635 तर सोने 150 ग्रॅम 800 मिली, चांदी 4 किलो 635 ग्राम जमा झाली आहे
तब्बल 22 लाखांनी भाविकांकडून दान पेटीत दान करण्यात आले आहे
उन्हाळ्याच्या सुट्टयामुळे माहूरला भाविकांची गर्दी असून त्यातून दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी नांदेड जिल्ह्यातील माहूर इथल्या श्री रेणुका देवीचं मूळपीठ
तीर्थक्षेत्र माहूर गड हे भगवान दत्तप्रभू यांची जन्मभूमी आहे तर देवीदेवेश्वरी निद्रास्थान असल्याने माहूरगड अधिक महत्त्व आहे
या ठिकाणी अनुसया मंदिर, दत्त मंदिर, सर्वतीर्थ, वडगुंफा, वनदेव आदि पुरातन मंदिरे आहेत.
कृतीयुगात अमली ग्राम, त्रेतायुगात सिद्तपूर, द्वापार युगात देवनगर आणि आता माहूर अशा नावांनी माहूरची ओळख आहे.