स्कूल चले हम! राज्यभरातील शाळा आजपासून सुरू; कुठे गुलाबाची फुलं देऊन, तर कुठे औक्षण करुन विद्यार्थ्यांचं स्वागत

राज्यभरातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत असून राज्यभरातील शाळांची आज घंटा वाजणार आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातोय
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी अभ्यास न देता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे.
विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन गोड भरून ओवाळून या विद्यार्थ्यांचे स्वागत केला जात आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनींही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आलं असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे.
याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पानंही देण्यात आली आहेत.