Nanded News: नांदेडच्या देळूब गावचा काबुली चणा आता सातासमुद्रापार
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यात पोषक हवामानामुळे गेल्या 20 वर्षापासून शेतकरी काबुली चणा अर्थात हरभऱ्याची शेती शेतकरी करीत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया काबुली चण्याला सातासमुद्रापार मागणी आहे. अमेरिका आणि दुबईला हा काबुली चणा निर्यात केला जातोय.
काबुली चणा म्हटलं की पंजाब , हरियाणा ही राज्ये आठवतात.
या राज्याप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन नांदेड जिल्ह्यातील देळूब इथं घेतलं जातंय.
अर्धापूर तालुक्यातील देळूब परिसरात मोठया प्रमाणात काबुली हरभऱ्याची पेरणी केली जाते
यंदा उत्पादनात प्रतिकुल वातावरणाचा फायदा काबुली हरभऱ्याला झालेला दिसून येत आहे.
एकरी दहा ते बारा क्विंटलचा उतारा मिळत असून एका क्विंटला 10 ते 12 हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
अर्धापूर तालुक्यातील देळूब बु. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात काबुली हरभऱ्याची पेरणी करतात.
गेल्या 20 वर्षांपासून रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून काबुली चण्याकडे पाहिले जाते.
काबुली हरभ ऱ्याच्या क्षेत्रफळात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे देळूब बु. गावाची काबुली हरभ ऱ्याचे गाव म्हणून ओळख बनली आहे. देळूब नांदेडला काबुली चण्याचेचे गाव म्हणून ओळखले जाते