PHOTO: नांदेडमध्ये 12 क्विंटल प्लास्टिक जप्त, मनपाची कारवाई
धनंजय सोळंके
Updated at:
29 Dec 2022 03:10 PM (IST)
1
नांदेड शहरात बंदी घातलेल्या प्लास्टिकचा साठा, विक्री व वापर वाढला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे नांदेड महानगरपालिकेने प्लास्टिक बंदी बाबत कारवाई सुरु केली आहे.
3
शहराला प्लास्टीक मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या विशेष पथकाने 28 डिसेंबरला कारवाई केली आहे.
4
महापालिकेच्या विशेष पथकामार्फत दुकानावर अचानक धाडी टाकून 12 क्विंटल प्लास्टिक तसेच 19 पाणी पाऊच बॅग जप्त करण्यात आले.
5
संबंधित दुकानदारांविरुध्द दंडात्मक कारवाई करुन एकूण रु. 1 लाख 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.
6
यापूढे शहरात प्लास्टिक साठवणूक, वाहतूक व वापर करणाऱ्या दुकानावर आणि उपद्रवकारक कृत्य करणाऱ्यांविरुध्द कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे, असे मनपाने कळविले आहे.