विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, हातात खोके आणि बोक्यांची प्रतिमा घेऊन सरकारवर हल्लाबोल
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरू झालयं. आजही विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आवळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, रोहित पवार, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.
आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात टेलीबर्डचे बोके व खाली खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला.
खाऊन खाऊन पन्नास खोके.. माजले बोके, माजले बोके... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली.
काल संत्री तर आज खोके हातात घेऊन विरोधकांनी हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा.. म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते.
राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून निघाला.
खाऊन खाऊन पन्नास खोके.. माजले बोके, माजले बोके अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली.
मंत्र्यांना खोका, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका.. विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका, महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका या घोषणा आमदारांकडून देण्यात येत होत्या.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांचे 'पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा कायम आहेत.
महाविकास आघाडीच्या आमदारांकडून दररोज नवीन घोषणा देत विधानभवन परिसरात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.