Photo : हिवाळ्यात बीट खाण्याचे फायदे काय?
बीट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या गुणधर्मांमुळं त्याला सुपरफूड म्हटले जाते. बीटाचा रस देखील शरीराला अनेक प्रकारचे फायदेशीर ठरतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीट खाल्ल्यामुळं वजन नियंत्रित होण्यास मदत मिळते. तसेच रक्तदाब कमी करण्यातही बीट फायदेशीर ठरते. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं बीट खाणं महत्त्वाचे आहे.
बीटाच्या रसामध्ये नायट्रेट असते जे रक्तप्रवाह सुरळीत करते. ज्यामुळं रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट असते. जे शरीराच्या स्नायूंना मजबूत बनवते. बीटचा रस प्यायल्यानंतर हृदयासंबंधित असणाऱ्या तक्रार कमी होतात, हे अभ्यासातून समोर आलं आहे.
बीट खाल्ल्याने स्मरणशक्ती सुरळीत राहते. बीटामध्ये असणारे नायट्रेट वृद्धांच्या मेंदूत रक्त प्रवाह वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे स्मरणशक्ती सुव्यवस्थित राहते.
बीटच्या रसामध्ये कॅलरी कमी असतात. त्यामध्ये फॅट मुळीच नसते. त्यामुळं या रसाच्या सेवनाने वजन वाढीवर नियंत्रण मिळवता येत. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी बीट महत्वाचे आहे.
बीटच्या रसात लोह, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त, तांबे आणि सेलेनियम असते. ही सर्व खनिजे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि दात व हाडे निरोगी ठेवतात.
अधिकचे जंक फूड खाण्याने यकृताचे नुकसान होते. बीटामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. तसेच यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवतात.
कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांनी बीटच्या रसाचा आहारात समावेश करावा. बीटाच्या रसात फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात. खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. त्यामुळं वीट खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.