Bail Pola : विदर्भात पोळ्यासाठी लाकडी बैल विक्रीला, नंदी बैलाच्या किंमतीत मोठी वाढ
शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबराब राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा सणाला अवघा एक दिवस शिल्लक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भात तान्हा पोळ्याचा (नंदी पोळा) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत.
महाराष्ट्रात काही ठिकाणी प्रतिकात्म मातीच्या किंवा लाकडी बैलांची पूजाही केली जाते.
मात्र लहान मुलांसाठी लाकडी नंदीबैल पोळा हा नागपूरसह विदर्भातील काही मोजक्याच भागात भरवला जातो.
वर्ध्यातील बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात सागाच्या लाकडापासून तयार केलेले नंदी विक्रीस आले आहेत.
लहान मुलांवर कृषीप्रधान भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावे या उद्देशाने नागपूरकर भोसल्यांनी दीडशे वर्षांआधी ही परंपरा सुरु केली होती.
पोळ्यानिमित्त लाखडी नंदीची बाजारपेठ सजली असून 2 लाखांपर्यंत किमतीचे नंदी बाजारात विक्रीला आले आहेत.
नंदी बनवायला आवश्यक असणारे सागाचे लाकूड पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने नंदी बैलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
वर्ध्यात एक बैलाची किंमत दोनशे रुपयांपासून तर 25 हजारापर्यंत वाढली आहे.
असं असलं तरीही ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.