Raksha Bandhan 2023 : नागपुरात विद्यार्थ्यांनी बनवली 57 बाय 34 फुटांची भव्य राखी, इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित
नागपुरातील ललिता पब्लिक स्कूलमध्ये 57 बाय 34 फूटाची भव्य राखी विद्यार्थ्यांनी तयार केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरातून साहित्य आणून विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही राखी इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी तयारी केलेली ही राखी पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे.
शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी एक आठवड्याच्या मेहनतीनंतर ही इकोफ्रेंडली राखी बनवली आहे.
त्यासाठी लागलेलं प्रत्येक साहित्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातून आणलं.
शाळेत भव्य राखी बनवण्याचा हा उपक्रम पार पाडला आहे.
ललिता पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीच विद्यार्थ्यांच्या हातून एक मोठी राखी बनवून घेण्याचा उपक्रम राबवला जातो.
यावर्षी नुकतंच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी किमया घडवून भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केली.
त्यामुळे यंदाची राखी इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित करण्यात आली आहे.