PHOTO : नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा
नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात तान्हा पोळा रंगला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल, अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल, यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश, सजलेले बैल अन् नटलेले चिमुकले, खाऊची धम्माल, बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासून महापुरुषांची वेशभूषा. यामुळे मुलांचे कौतुक होत आहे.
उत्साहपूर्ण वातावरणात शहरात अनेक ठिकाणी तान्हा पोळा साजरा करण्यात आला.
नागपूर शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
यंदा लाकडी बैलांच्या म्हणजेच तान्हा पोळ्यास 216 वर्षे पूर्ण होत आहेत.
आपल्या कृषीप्रधान देशात बैलांचा सण 'पोळा' साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात.
लहान मुलांना बैलाचे महत्व कळावे म्हणून त्यांनी लाकडी बैल पोळ्याची सुरूवात केली.
तान्हा पोळ्यादरम्या चिमुकल्यांच्या विविध वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.
पर्यावरण, अंधश्रद्धा, बेटी बचाओ, महागाई, स्त्री अत्याचार, अशा विविध विषयांवर चिमुकल्यांनी संदेश दिले.
आकर्षक वेशभूषा आणि चांगल्या नंदीला पुरस्कार मिळतो. यामुळे मुलांना याची जास्त आवड असते.
गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरमध्ये ही परंपरा जपली जाते.
चिमुकल्यांसह पालकांनी देखील या तान्हा पोळ्यात उत्साहाने सहभाग घेतला.
तान्हा पोळ्यात हजारो बालकांनी आकर्षक वेशभूषा करून हजेरी लावली
विविध वेशभूषा केलेल्या बालकांनी आपले नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्यात हजेरी लावली.
तान्हा पोळ्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
चिमुकल्यांनी शेतकरी, श्रीकृष्ण, राधा, विठ्ठल, शंकरजी, श्रीगणेश, तिरुपती बालाजी आदींची वेशभूषा केली होती.
शंकराची वेशभूषा केलेल्या चिमुकलीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.