Marbat : ईडा पिडा घेऊन जा गे मारबत! नागपूरसह विदर्भात मारबत मिरवणुकीचा उत्साह
Marbat : ईडा पिडा घेऊन जा गे मारबत, विदर्भात मारबत मिरवणुकीचा उत्साह
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 140 वर्षांची परंपरा असलेला मारबत मिरवणूक सोहळा विदर्भात सुरु आहे.
दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधांनंतर निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकरांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.
सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या काळ्या आणि पिवळ्या मारबत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात..
यंदाही नागपूरच्या छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाचा बडग्या लक्ष वेधून घेत आहे.
सध्याच्या राजकीय विषयावर भाष्य करणारा बडग्या नागपुरात चर्चेचा विषय ठरलाय. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे रूप म्ह्णून काळी मारबत, तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्याने त्या रूढी परंपरांचे उच्चाटन व्हावे, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो.
मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे.
यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात.
श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे रूप म्ह्णून काळी मारबत, तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते.
प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्याने त्या रूढी परंपरांचे उच्चाटन व्हावे, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो.