Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला महाल परिसर; हजारों विद्यार्थ्यांचे सामूहिक शिवस्तुती पठण
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे साऱ्यांनाच वेध लागले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारीला देशभर मोठ्या हर्ष-उल्हासात साजरी केली जाणार आहे.
19 फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्याने नागपुरात श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक 'शिवस्तुती' गायली आहे.
नागपुरच्या महाल येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे सुमारे दोन हजारांहूर आधिक शालेय विद्यार्थी या सामूहिक 'शिवस्तुती'कार्यक्रमाला उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी एकसाथ केलेल्या छत्रपतींच्या जयघोषाने अवघा महाल परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी संजय देशकर यांनी विद्यार्थ्यांना शिवस्तुती चे महत्व पटवून दिले. आणि त्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या सर्व 2000 विद्यार्थ्यांनी सामूहिक शिवस्तुती म्हटली.
या उपक्रमात राजेंद्र हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, सी.पी अँड बेरार हायस्कूल, श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय , इत्यादी शाळा सहभागी झाल्या होत्या.
विद्यार्थीजीवनातच शिवचरित्राचे महत्व आणि आपला जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहाचाव हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
येत्या 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रामुख्याने भव्य रक्तदान शिबिराचे या परिसरात आयोजन करण्यात आले आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी आणि शिव भक्तांनी कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे