Aadivasi Protest Nagpur: आदिवासी गोंड गोवारी समाजाचे तीव्र आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर

आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरातील संविधान चौकात समितीचे 3 आंदोलक मागील 11 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे.

गेल्या 26 जानेवारीपासून या आंदोलकांनी नागपुरात आमरण उपोषण सुरु केले.
मात्र, या उपोषणाकडे शासनाने पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान उपोषणावर असलेल्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
शासनाच्या या कृती विरोधात आदिवासी गोडगोवारी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
परिणामी याविरोधात नागपूरातील संविधान चौकात समाज बांधवांकडून आपले अधिकार आणि हक्कासाठी आज 5 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढला.
शासन मागण्यांना घेऊन गंभीर नसून फक्त आश्वासन देऊन समाजाची दिशाभूत केली जात आहे.
खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपोषण मंडपात भेट देत नाही, तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहिल, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला आहे.
आज या आंदोलनामुळे नागपुरातील संविधान चौक परिसरात वाहतूक व्यवस्था काही काळ बंद झाली होती.