Nagpur : जागतिक अन्न दिनी विष्णू मनोहरांनी तयार केला अडीच हजार किलोचा 'महा-चिवडा'; पाहा फोटो
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या महाचिवडा विश्वविक्रम उपक्रमात कांचनताई गडकरी, माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाचिवडा उपक्रमाचे प्रयोजक असलेल्या रामबंधू तर्फे विपणन व्यवस्थापक भानुदास गुंडकर यांनी कांचनताई गडकरी यांचे स्वागत केले.
विष्णू मनोहर यांच्या चाहत्यांनी विविध भेटवस्तू देऊन त्यांना उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
सुहास कोथळकर यांनी विष्णू मनोहर यांच्या विविध 13 विश्वविक्रमांचे छायाचित्र असलेला केक यावेळी कापून त्यांचा हा उपक्रम साजरा केला.
याठिकाणी भेट देणाऱ्या नागपूरकरांनी विष्णू मनोहर यांच्यासोबत छायाचित्र काढून सोशल मीडियावर उपक्रमाबद्दल माहिती शेअर केली.
विष्णू मनोहर यांच्या चाहत्यांनी उपक्रमस्थळी एक वेगळाच माहोल तयार केला होता.
उपक्रमस्थळी भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कढईतून काढलेला गरमा-गरम चिवडा देण्यात आला.
कढईमध्ये तयार होत असलेल्या चिवड्याच्या प्रत्येक लॉटची चव यावेळी विष्णू मनोहर केल्यावरच नागरिकांमध्ये वितरित करित होते.
उपक्रमस्थळी विष्णू मनोहर यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार कृष्णा खोपडे यांनीही भेट दिली.
कुरकुरीत चिवड्याची चव घेण्यासाठी नागरिकांना उपक्रमस्थळी रांगा लावल्या होत्या.
फक्त मसालेच नव्हे तर सुखा मेवा आदींचे प्रमाण यावेळी चिवड्याच्या पहिल्या लॉटपासून तपासून तिच चव शेवटपर्यंत कायम ठेवण्यासाठी चमूकडून प्रयत्न करण्यात येत होते.