PHOTO : 'भारत मुक्ती मोर्चा'च्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी खासगी बसचा वापर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण हे लोकशाही विरोधी असून संघाची भूमिका संविधान विरोधाची असल्याचे आरोप करत भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी आज महारैलीचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी या रॅलीची परवानगी नाकारली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरवानगी नाकारल्यावरही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या (Bharat Mukti Morcha) हजारो आंदोलकाना ताब्यात घेताना पोलिसांची चांगलीच कसरत झाली. सतत वाढत असलेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पोलिसांना बोलवावा लागला.
आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या पोलिसांच्या व्हॅनही कमी पडल्याने खासगी बसेसचा वापर पोलिसांकडून करण्यात आला.
हायकोर्टानेही आज, 6 ऑक्टोबर रोजीची परवानगी नाकारल्यानंतरही भारत मुक्ती मोर्चा आपल्या आजच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होता. पोलिसांनी पाच ऑक्टोबरच्या रात्रीपासून तर गुरुवारपर्यंत सुमारे 150 लोकांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून एवढी खबरदारी घेण्यात आल्यावरही इंदोरा चौकात सकाळपासून हजारोंच्या संख्येत नागरिक जमण्यास सुरुवात झाली होती.
भारत मुक्ती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात महिला आंदोलकही आक्रमक दिसून आल्या.
या आंदोलनात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, भारतीय युवा बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मायनॉनिरीटी मोर्चा आदींचा सहभाग होता.
बेझनबाग ते बडकस चौक परिसरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच एकत्र जमणाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु होती.
बेझनबाग ते बडकस चौकापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्यामुळे आंदोलकांना मार्गातच पोलिसांकडून अडवून खासगी बसच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येत होते.
आंदोलक आक्रमक झाल्यावर पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.
आंदोलकांना ताब्यात घेताना पोलीस वाहनही कमी पडत असल्याने वेळेवर पोलिसांना खासगी बसची व्यवस्था पोलीस विभागाचा स्टिकर लावून करावी लागली.
एका आंदोलकाला पोलिस वाहनात बसवताना पोलिस वाहनाची काच तूटून पडली. कोणालाही ते लागू नये म्हणून तैनात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच ते काचेचे पडलेले तुकडे जमा करण्यास सुरुवात केली.
आंदोलकांना परत पाठविण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा इंदोरा चौकात पोहोचला होता.Nagpur News nagpur police nagpur protest Nagpur Bharat Mukti Morcha