Photo : नागपुरात झाडांना कोण करतंये रक्तबंबाळ?
नागपूर महापालिकेकडून शहरातील झाडांवर तब्बल चार लाख खिळे ठोकल्याचे समोर आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या 22 मार्चपासून नागपूरमध्ये ‘जी-20’ च्या उपसमितीची बैठक होणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे.
विदेशी पाहूण्यांसमोर शहराचे वास्तव समोर येऊ नये म्हणून शहर सजवण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, हे करताना महापालिकेकडून शहरातील झाडांवर तब्बल चार लाख खिळे ठोकल्याचे समोर आले आहे.
आता हे खिळे ठोकणाऱ्या महापालिकेकडून हा दंड कोण वसूल करणार? शहरातील झाडांचे झालेले नुकसान कोण भरुन काढणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
जी-20 च्या उपसमितीची नागपुरात 21 आणि 22 मार्च रोजी बैठक होत आहे. त्यासाठी नागपुरात प्रशासनाने स्वच्छता आणि सौंदर्यकरणाची जय्यत तयारी केली आहे.
शहरात रात्रीच्या वेळेलाही वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लाइट्सचा झगमगाट राहावं यासाठी नागपुरातील हजारो झाडांवर लाखो खिळे ठोकून विजेच्या रंगीत माळा, मोठ्या लाइट्स, हॅलोजन, पार लाइट्स लावण्यात आल्या आहेत
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन अधिनियम अन्वये झाडांवर खिळे ठोकण्यासह कुठलीही लोखंडी वस्तू ठोकण्यावर बंदी आहे. असे असताना अवघ्या दोन दिवसांच्या परदेशी पाहुण्यांच्या आगमनाच्या निमित्ताने प्रशासनाकडून हजारो वृक्षांवर लाईट लावण्याच्या नावाखाली लाखो खिळे ठोकण्यात आले आहेत.
नागपूरच्या सिविल लाईन्स परिसर आणि इतर अनेक भागात अशाच पद्धतीने झाडांना खेळ ठोकून जखमी करण्यात आले आहे.