Nagpur : नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरांच्या प्रवेश दारावर स्प्रिंकलर!
सध्या नागपूरचा पारा हा 41अंश सेल्सियाच्या वर पोहचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारच्या वेळेला नागपूरकरांना प्रचंड उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळते
त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिर प्रशासनाने
गणेश भक्तांना या उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळावा यासाठी मंदिरांच्या प्रवेश दारावर स्प्रिंकलर लावले आहेत
स्प्रिंकलर च्या माध्यमातून निघणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांनी वातावरण थंड होत असल्याने
गणेश भक्तांना दर्शनाआधीच प्रसन्न वातावरणाची अनुभूती येत आहे.
नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरांच्या प्रवेश दारावर स्प्रिंकलर
भाविकांना उष्णतेपासून दिलासा!
मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून, दुपारच्यावेळी घराबाहेर पडणं अवघड होत आहे.
विशेष म्हणजे सायंकाळनंतर उकाडा त्रस्त करून सोडत असून, भर दुपारी रस्ते, बाजारपेठांतील वर्दळ कमी होऊ लागली आहे.
दुपारी प्रचंड ऊन पडत असल्याने नागरिक घरातच आराम करताना पाहायाला मिळत आहे.