Reticulated Python : नागपुरातील प्राणी संग्रहालयात आणले 30 ते 34 फुटांपर्यंत वाढणारे जाळीदार अजगर
नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सहा खास अजगर आणण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वात जास्त लांबीपर्यंत म्हणजेच 30 ते 34 फुटापर्यंत वाढू शकणारे हे अजगर आहेत.
जाळीदार अजगर म्हणजेच रेटिक्युलेटेड पायथॉन असे त्यांचे शास्त्रीय नाव असून त्यांना मंगलोरच्या प्राणी संग्रहालयातून नागपुरात आणले आहेत.
हे जाळीदार अजगर सध्या किशोरावस्थेत असून त्यांची सध्याची लांबी 8 ते 10 फूट एवढी आहे.
साधारणपणे पुढील 4 वर्षात त्यांची लांबी 25 ते 30 फुटांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे.
हे जाळीदार अजगर केवळ अंदमान निकोबार बेट आणि ईशान्य भारतातल्या घनदाट जंगलात आढळतात. शिवाय म्यानमार आणि इंडोनेशियात ही आढळून येतात.
आता पर्यटकांना नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट, अस्वल, हरीण सनगाई यासह आता हे जाळीदार अजगर ही पाहता येणार आहे.