राज्याचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे; नागपुरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि सुप्रीया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्या जिल्ह्यात बॅनर्स झळकल्याचं पाहायला मिळालं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता आदित्य ठाकरे यांचंही नाव आलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ मनसर येथे आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत.
नागपूरमधील उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री म्हणून झळकावण्यात आलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आदित्य ठाकरे आज अवघ्या काही तासांच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
नागपूर दौऱ्यात आदित्य ठाकरे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पारशिवनी तालुक्या अंतर्गत वराडा आणि नांदगाव परिसरात भेट देणार आहेत.
वराडामध्ये कोळसा उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण आणि पिकांची हानी संदर्भात ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.
नांदगाव परिसरात महानिर्मितीकडून औष्णिक वीज केंद्राची राख साठवण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेला स्थानिकांचा विरोध असल्यानं नांदगाव परिसरात स्थानिक गावकऱ्यांनाही आदित्य ठाकरे भेटणार आहेत.