Snake in Scooter : महिलेच्या स्कूटरच्या हेडलाईटमधून साप निघाला, नागपुरातील थरारक घटना
महिलेच्या स्कूटरच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्कूटरच्या हेडलाईटमधून साप काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
सीमा ढूलसे नावाची महिला बँक योजनेच्या कलेक्शनचे काम करतात.
मंगळवारी त्या नागपूरच्या वाठोडा परिसरातील एका इमारतीमध्ये कलेक्शन साठी गेल्या होत्या.
इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची स्कूटर पार्क केली होती.
काम आटोपून परत आल्यावर स्कूटर काढताना हेडलाईटमधल्या गॅपमध्ये त्यांना सापाची शेपटी दिसली, त्यांनी लगेच स्कूटर थांबवली व सर्पमित्रांना फोन केला.
सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन हेडलाईट मधून साप बाहेर काढला.
हा साप बिनविषारी तस्कर प्रजातीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
मात्र गाडी काढतानाच साप असल्याचे लक्षात आल्याने बरे झाले नाही तर चालत्या गाडीत जर साप बाहेर आला असता तर अपघात होण्याची शक्यता होती.