Nagpur News : नागपुरात मेट्रोचे इंजिन आणि डबे स्प्रे पेंटने रंगवले, अज्ञाताविरोधात मेट्रो विद्रूप केल्याचा गुन्हा

नागपुरात खापरी मेट्रो स्टेशन आणि मिहानमधील मेट्रो डेपोच्या दरम्यान ट्रॅकवर उभ्या असलेल्या मेट्रो ट्रेनला अज्ञात व्यक्तीने रंग लावून त्याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला.

Nagpur Metro Spray Paint

1/7
नागपुरात मेट्रोचे इंजिन आणि डबे स्प्रे पेंटने रंगवून ते विद्रूप केल्याची घटना घडली आहे.
2/7
नागपुरातील खापरी मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.
3/7
खापरी मेट्रो स्टेशन आणि मिहानमधील मेट्रो डेपोच्या दरम्यान ट्रॅकवर उभ्या असलेल्या मेट्रो ट्रेनला अज्ञात व्यक्तीने रंग लावून त्याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला.
4/7
बुधवारी (9 ऑगस्ट) संध्याकाळी ही घटना उघडकीस आली.
5/7
अज्ञात व्यक्तीने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मेट्रोचे इंजिन आणि डब्यांना वेगवेगळ्या स्प्रे पेंटने रंगवलं.
6/7
मेट्रो प्रशासनाने सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7/7
धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं कव्हरेज नाही.
Sponsored Links by Taboola