Flower Festival : हिस्लॉप कॉलेज मध्ये बहरला फुलोत्सव; यंदाचे 20 वे वर्ष
आजपासून हिस्लॉप कॉलेज येथे 'फ्लॉवर शो'चे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे 20 वर्ष आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App16 आणि 17 डिसेंबर असे दोन दिवस या 'फ्लॉवर शोचे' आयोजन करण्यात आले आहे.
आज, शनिवारी सकाळी 10 वाजता मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि एमएडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
या फुलउत्सवात शेवंती, गुलाब, झेंडूसह १२ हजार फुले आणि रोपटे प्रदर्शनात आकर्षिक पद्धतीने सजविण्यात आल्या आहेत.
यंदा या शोचे आकर्षण म्हणजे, यावर्षी नक्षत्रवन या विषयाशी संबंधित 27 नक्षत्र आणि 12 राशींशी संबंधित रोपट्यांचे परिसरातील सजवटीसाठी उपयोग केल्या गेले आहे.
वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांद्वारे कोणत्याही रासायनिक किंवा सिंथेटिक सामग्रींचा वापर फुलांना वाढविण्यात न केल्याची सांगण्यात आले.
दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात येत असतं. यंदाचे हे 20वे वर्ष आहे.
या उत्सवात फुलांचे प्रदर्शनसह विक्री करीता देखील रोपटे उपलब्ध आहेत.
हे प्रदर्शन बघण्यासाठी आजपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फ्लॉवर शोला भेट द्यावी असे आवाहन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत शेळके यांनी केले.