Nagpur : किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली? विधीमंडळ परिसर आणि नागपुरात पोस्टर्स
सध्या राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाचा आज साहवा दिवस आहे. या अधिवेशन दरम्यान विविध मागण्या घेऊन असंख्य मोर्चे-आंदोलन विधान भवनावर धडकत असतात.आपली मागणी पूर्ण व्हावी अशीच सर्वसामान्य आंदोलकांची अपेक्षा असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच अधिवेशनात आता एका बॅनरची चांगलीच चर्चा होतेय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? अशा आशयाचे बॅनर्स विधीमंडळ परिसरासमोर लागलेत.
'किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली?' असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय.
विधीमंडळ परिसर आणि रविभवन परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्स सऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. हे बॅनर्स कोणी लावले या बद्दल अद्याप तरी स्पष्टता नाही.
या बॅनर्सच्या खाली न्यायाच्या अपेक्षेतील एक पीडित रुग्ण असे लिहाण्यात आले आहे.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी ही केवळ एका महिलेपुरती मर्यादित नसून अनेक जणांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढल्याचे उघड झाले होते.
रुबी हॉल क्लिनिक प्रत्यारोपण आणि किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश नुकताच झाला होता.
ज्यामध्ये कोल्हापूरच्या सारिका सुतार या विधवा महिलेने पुण्यातील पंचतारांकित रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी टोळी प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.
गुन्हे शाखेच्या तपासामध्ये रूबी हॉल क्लिनिकमध्ये फक्त सारिका सुतारच नव्हे तर अनेक जणांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढून प्रत्यारोपण करण्यात आल्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी आतापर्यंत रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे.