Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Mla Nitin Deshmukh) जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या (Nagpur) सीमेवर दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी नितीन देशमुखांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
0 एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या (21 एप्रिल) नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते.
जवळपास 500 च्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी आधीच सर्व तयारी केली होती. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
10 एप्रिलला नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा सुरु झाली होती. उद्या ही यात्रा फडणवीस यांच्या घरासमोर पोहोचणार होती.
पोलिसांनी आमदार देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस आता देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
आमदार नितीन देशमुख यांच्या संघर्ष यात्रेला नागपूरच्या सीमेवर धामना या गावात पोलिसांनी स्थानबद्द केले होते. यावेळी त्या परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या यात्रेनं 250 किलोमीटरचे अंतर पार केलं होतं. अद्याप 30 किलोमीटर अंतर जाणं बाकी होतं. त्यापूर्वीच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.