Assembly Session 2023 : शेतकरी झाला कासाविस, खोके सरकार 420, विरोधकांच्या घोषणा!
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी विरोधकांनी घोषणांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातलं (Nagpur )वातावरण तापणार आहे.
पुढचे 10 दिवस नागपूर (Nagpur) राजकीय घडामोडींचं केंद्र असेल.
या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळाली तर विरोधकांच्या या घोषणांनी वातावरण तापलं! विरोधकांच्या घोषणांनी वातावरण तापलं!
विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु, पहिल्याच दिवशी विरोधकांची तुफान घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं!
1) शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय हमीभावाचं गाजर!
2) शेतकरी झाला कासाविस, खोके सरकार 420
3) सरकार सांगतंय दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य
4) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
5) खोके सरकार, गद्दार सरकार हाय हाय हाय हाय
6) दुष्काळ, गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त, खोकेवाले गद्दारांचे सरकार मधमस्त
7) बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त