Polluted Rivers in Maharashtra : देशातील 603 पैकी 311 नद्यांचे क्षेत्र प्रदूषित; तर सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात
नुकताच देशातील नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम’ राबवण्यात आला.ज्यामध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अहवालानुसार देशातील 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांतील 603 पैकी 311 नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित आढळली.विशेष बाब म्हणजे यात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रमातंर्गत देशातील नद्यांच्या प्रदूषणाचे प्रमाण ठरवले जाते. ज्यामध्ये पाण्यातील रसायने, सूक्ष्मजीव यांचा विचार केला जातो. तसेच पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावरून त्याचे प्रदूषण देखील ठरवले जाते.
यापूर्वी 2018 मध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यात 351 नद्यांचे काही पट्टे प्रदूषित जाहीर करण्यात आले होते.
त्यानंतर आता हा अहवाल प्रकाशित झाला आहे. यात देशातील 603 नद्यांपैकी 311 नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली आहेत.
ज्यामध्ये महाराष्ट्रातील 55 , मध्यप्रदेशातील 19 , बिहारमधील 18 , केरळमधील 18 आणि कर्नाटकातील 17 नद्यांचा समावेश प्रदूषित नद्यांमध्ये आहे.
2019 आणि 2021 यादरम्यान महाराष्ट्रातील 55 नद्यांचे 147 ठिकाणी घेतलेले नमुने प्राणवायू मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले.
महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भिमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्याखालोखाल गोदावरी, पावना, कन्हान आणि मुठा-मुळा या नद्या प्रदूषित आढळल्या.
उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याची गांभीर्याने तपासणी करत नाही.
उद्योगातील घातक रसायने आणि सांडपाणीही नदीप्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.