Laxmi Nagar Ganesh Mandal: गणेश मंडळ जपतोय सामाजिक बांधिलकीचा वारसा, तब्बल नऊ वर्षांपासून धातूच्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना...
शहरातील लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ मागिल दहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत असून गेल्या नऊ वर्षांपासून धातूद्वारा निर्मिती गणेश मूर्तीची स्थापना या मंडळातर्फे दरवर्षी करण्यात येते. यासोबतच दर्शनाला येणाऱ्या भाविकांना हार, फूल, प्रसाद न आणता वही आणि पेन आणण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मंडळातर्फे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन गणेश मंडळातर्फे आयोजित करण्यात येते.
गणेश मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
गणेशोत्सवात प्राप्त पेन आणि वह्या मंडळातर्फे नागपुरातील गंगा जमूना या भागातील वारांगना यांच्या पाल्यांना दान करण्यात येतात हे विशेष.
लक्ष्मीनगर गणेश मंडळाच्या या विविध सामाजिक उपक्रमांची स्तुती राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते मंडळीकडून सतत करण्यात येत असून इतर मंडळांनीही या प्रकारे गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात येते.
पर्यावरण संवर्धनासाठी मंडळातील तरुण कार्यकर्ते विविध अभियान राबवत असतात.
लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात येते. तसेच फक्त वृक्षारोपणच नव्हे तर त्या रोपट्याचे वृक्ष होईपर्यंत त्याची जबाबदारीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यात येते.
मंडळाला भेट देणारे भाविकही वही आणि पेन या आवाहनाला प्रतिसाद देतात. दरवर्षी सुमारे 5 हजारांवर पेन आणि वह्या मडंळाला भाविकांकडून प्राप्त होतात.
शहरातील इतर गणेश मंडळांनीही या प्रकारे गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येते.