Nagpur Ganeshotsav 2022 : उपराजधानीत गणरायाचे जल्लोषात आगमन...
तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) नागपुरकरांना अनुभवण्यास मिळत असून याचा उत्साह आजच्या जल्लोषात दिसून आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी विविध गणेश मंडळांनीही जोरात तयारी केली होती.
झेंडा चौक येथील धरमपेठ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे आकर्षत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली असून यंदा मंडळाचे 63 वे वर्ष आहे.
शहरातील विविध भागात दिवसभर ढोल ताशांचा गजर सुरु होता. तसेच भाविक आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट बघताना दिसले.
दरवर्षी विविध तीर्थ स्थळांचे दर्शन नागपुरकरांना घडवून आण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संती गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. यंदा मंडळाने वृंदावन येथील बाकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) निर्बंधात साजरे करावे लागले असल्याने यंदा दोन वर्षांची कसर भाविकांनी भरुन काढली.
शहरातील अनेक मंडळांनी देखावेही तयार केले असून त्यात विविध थिमवर आधाराती संस्कृती नागपुरकरांना अनुभवण्यास मिळत आहे.