Deekshabhoomi : दीक्षाभूमीवर तीन वर्षानंतर उसळला भीमसागर...
दीक्षाभूमीवर पावसाने हजेरी लावली तरी अनुयायांनी अस्थिकलशाच्या मोठी गर्दी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीक्षाभूमीपासून शांतीवन आणि ड्रॅगन पॅलेस परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो बांधवांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन रूढी परंपरांच्या वणव्यात पोळून निघालेल्या समाजाला नवी दिशा दिली.
दीक्षाभूमीच नव्हे तर संपूर्ण परिसराला उत्सवाचे स्वरुप आले आहे. चौकाचौकात विविध संस्थांकडून अन्नदानाची व्यवस्था, बसण्यासाठी निवारा, आरोग्य तपासणी आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
दीक्षाभूमी प्रांगणात असलेल्या स्टॉल्सवर विविध आंबेडकरी साहित्य खरेदीसाठी बौद्ध बांधवांनी गर्दी केली.
बांधवांच्या मदतीसाठी पोलिस मदत केंद्रही उभारण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना मार्गदर्शनाच्या सूचना, निवाऱ्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती देण्यात येत आहे..
परिसराच्या स्वच्छतेसाठी मनपाचे स्वच्छता कर्मचारीही सज्ज असल्याने संपूर्ण परिसरात स्वच्छता दिसून येत आहे.
बौद्ध बांधव आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत.
दीक्षाभूमी परिसरात लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सवर गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक मूर्ती बघण्यास मिळत आहेत.
याठिकाणी असलेल्या प्रत्येक स्टॉलवर बांधव भेट देऊन धम्म मूर्ती, साहित्य विकत घेताना दिसत आहे.