RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव, तुफान गर्दी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन नागपुरातील रेशीमबाग मैदानात करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
यंदा प्रथमच महिला अतिथी आमंत्रित करण्यात आल्या. दोनदा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या गिर्यारोहक संतोष यादव या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी दोनदा एव्हरेस्ट पर्वतावर यशस्वी चढाई करुन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे
एव्हरेस्ट पर्वतावर यशस्वी चढाई करणाऱ्या संतोष यादव या जगातील पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला होत्या.
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात होणारा उत्सव, संघ शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
लोकसंख्या वाढीचा असमतोल असेल, तर त्याचे काय परिणाम होतात, हे आपण 50 वर्षांपूर्वी अनुभवले आहे. लोकसंख्या वाढीत पंथ, संप्रदाय यांच्यातील देश तुटतो. त्यामुळे या असंतुलनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.