IN PICS | नागपुरात रस्ता रुंदीकरणासाठी दुकानं उठवल्यानंतर दृष्टीक्षेपात आलं पुरातन मंदिर
नागपुरात महाल परिसरातील केळी बाग रोडवर रस्ता रुंदीकरणासाठी दुकानाची ओळ तोडल्या नंतर एक पुरातन मंदिर दृष्टिक्षेपात आले आहे. गेली चार दशकं या मंदिराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटल्याने हे मंदिर वेढले जाऊन दिसेनासे झाले होते. कारण हे भोसलेकालीन मुरलीधर मंदिर दुमजली दुकानांच्या विळख्यात अडकल्यानं बाहेर रस्त्यावरून दिसतच नव्हते. परिसरातील नव्या पिढीने हे मंदिर नजरभर पाहिलेच नव्हते. नागपुरातील हा ऐतिहासिक पुरातन ठेवा नजरेज पडल्यानं नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त करत त्याचे व्यवस्थित संवर्धन व संरक्षण करण्याची मागणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाल परिसरातील केळी बाग रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता रुंदीकरणासाठी दुकानाची ओळ पाडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी या भागातील अनेक नागरिकांच्या घर आणि दुकानांचा काही भाग रीतसर अधिग्रहित करून त्यांना मोबदलाही दिला जात आहे.. तर अनेकांनी केलेल्या नियमबाह्य अतिक्रमणावर ही हातोडा पडला आहे. कोतवाली पोलीस स्टेशनच्या अगदी समोर रस्ता रुंदीकरणासाठी दुकांनांची ओळ तोडण्याची कारवाई झाल्यानंतर दुमजली दुकांनांच्या विळख्यात अडकलेलं भोसलेकालीन मुरलीधर मंदिर दुरष्टिक्षेपात पडला.
हे मंदिर ऐतिहासिक असून हेरिटेज श्रेणीतील ग्रेड 1 मधील आहे. मात्र, 1980 नंतर मंदिराच्या अवतीभवती किती मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व्यवसायिक बांधकाम झाले होते, हे काही दिवसांपूर्वीवंच्या या फोटोज वरून तुमच्या लक्षात येईल. परिसरातील व्यवसायिकांनी गेल्या चार दशकात हळूहळू त्यांच्या दुकानं मंदिराच्या सर्व बाजूंनी वाढवत मंदिराला वेढाच घातला होता. त्यामुळे केळीबाग रस्त्याच्या बाजूने दुमजली दुकानांमुळे रस्त्यावरून मंदिर दिसेनासा झाला होता. दुमजली दुकानांच्या पलीकडे मंदिराच्या कळसाचा काही भागच रस्त्यावरून दिसायचा. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या निमित्तानं कारवाई झाली आणि मंदिर दृष्टीक्षेपात पडल्यामुळे परिसरातील नागरिक समाधानी आहे.
भोसले काळात निर्माण झालेला या मंदिरात काळ्या दगडांचा मुरलीधर मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी सुबक असं कोरीव काम करण्यात आला आहे. अनेक सुंदर मूर्ती दगडात कोरण्यात आल्या आहेत. मात्र आपल्या व्यवसायिक फायद्यासाठी अवतीभोवतीच्या काही दुकानदारांनी मंदीराला खेटून त्यांची दुकानं वाढवली, ज्यामध्ये नवनवीन बांधकाम केलं आणि मंदिराच्या कोरीव कामाला मोठं नुकसान पोहचवलं.
आज जेव्हा या नियमबाह्य बांधकामाच्या विळख्यातून मंदिर मोकळ झालं आहे तेव्हा या मंदिराचं खरं सौंदर्य अनेक वर्षांनंतर लोकांच्या नजरेस पडलं आहे, तसेच आपल्या व्यवसायिक फायद्यासाठी काही दुकानदारांनी मंदिराला किती नुकसान पोहोचवले आहे हे कटू सत्य ही समोर आले आहे.
आपल्या देशातील पर्यटन क्षेत्र असोत किंवा ऐतिहासिक वारसाचे ठिकाण, सर्वच ठिकाणी काही बेजबाबदार नागरिकांमुळे फक्त तिथली स्वच्छता आणि सौंदर्यच नष्ट होत नाही. तर अमूल्य असा ऐतिहासिक वारसा ही धुळीस मिळतो.
मात्र नागपुरात रस्त्यासाठी न्यायालयीन लढाईतून एक ऐतिहासिक मंदिर वेळीच मोकळा झाल्यामुळे त्याचा सौंदर्य आणि इतिहास आता जगासमोर नव्याने येणं शक्य झालं आहे.