In Pics: क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह Sanjana Ganesan सोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, जाणून घ्या कोण आहे संजना गणेशन?
sanjana ganesan
1/8
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह येत्या वीकेंडला गोव्यात क्रिकेट प्रेंझेंटर संजना गणेशन सोबत लग्नबंधनात अडकू शकतो. बुमराहने खास कारणासाठी इंग्लंडच्या बाकी दौऱ्यापासून सुट्टी घेतली आहे.
2/8
ही 28 वर्षांची तरूणी कोण आहे? तुम्ही या टीव्ही अँकर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
3/8
संजना गणेशनला पहिल्यांदा 2012 मध्ये 'स्प्लिट्सविला 7' मध्ये स्पर्धक म्हणून लोकप्रियता मिळाली. परंतु एका दुखापतीमुळे तिचा कार्यक्रमातील प्रवास संपला.
4/8
संजना टीव्ही प्रेंझेंटर बनण्याआधी एक मॉडेल होती. तिने 'फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस' अॅवॉर्ड जिंकला. तसेच तिने '2021 फेमिना स्टाईल दिवा' फॅशन शो मध्येही भाग घेतला होता.
5/8
2014 मध्ये संजनाचे मॉडेलिंग करिअर खूप चांगले सुरू होतं. ती 'फेमिना मिस इंडिया पुणे' स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात देखील होती.
6/8
तिला 2019 साली क्रिकेट विश्व कप दरम्यान स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर 'मॅच पॉंईट' आणि 'चिकी सिंगल्स' हे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. संजना प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पीबीएल) ची होस्ट होती. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. संजनाने स्टार स्पोर्ट्सचा 'दिल से इंडिया' या कार्यक्रमाचा एक सेगमेंट देखील होस्ट केला होता.
7/8
संजनाचे आयपीएल टीम केकेआर सोबत चांगले संबंध आहेत. ती केकेआरच्या फॅन्ससाठी 'द नाइट क्लब' नावाच्या एका विशेष चर्चासत्राच्या कार्यक्रमाची होस्ट देखील होती.
8/8
संजना गणेशन कदाचित 14 किंवा 15 मार्चला भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहसोबत लग्न करेल. परंतु या दोघांनीही लग्नाबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
Published at : 12 Mar 2021 02:11 PM (IST)