In Pics : शेतकरी, बेरोजगार, महागाईच्या प्रश्नावर विधानभवनावर 'आप'चा महामोर्चा
राज्यभरातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाल्यामुळे तब्बल दीड किलोमीटर लांब रांगा यशवंत स्टेडयिमपासून लागल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशा मागण्या घेत आम आदमी पार्टीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य महामोर्चा काढला.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.
शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, महागाई, व सामान्य जनतेच्या मागण्यासाठी विधानभवनावर आम आदमी पार्टीचा हा महामोर्चा होता.
या महामोर्चात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिन्दे, राज्य उपाध्यक्ष धनराज वंजारी व डॉ फैजी, विधर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे कुसुमाकर कौशिक, अंसार शेख हे उपस्तित होते.
यावेळी संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या, ही मागणीही यावेळी करण्यात आली.
यासोबतच पिक-विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करा, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम द्या. उसाची FRP वाढवून ठरविलेली FRP एक रक्कमी देण्याचा GR काढा. कापसाला प्रती क्विंटल दहा हजार रुपये हमी भाव देवून निर्यात वाढविण्यात यावी ही मागणीही करण्यात आली.
आपतर्फे वीज कंपन्याचे खाजगीकरण थांबवून ऑडित करा, दिल्ली सरकार प्रमाणे 200 युनिट मोफत व चारशे युनीटपर्यंत अर्धा दरात नागरिकांना वीज द्या, ही मागणीही करण्यात आली.